Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 125

परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे

जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात;

ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.

यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती

आता आणि सर्वकाळ आहे.

नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही.

नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.

हे परमेश्वरा, जे चांगले आहेत,

आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.

पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात,

परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल.

इस्राएलांवर शांती असो.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.