इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 126
परत आणल्याबद्दल उपकारस्तुती
सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले,
तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले.
मग आमचे मुख हास्याने,
आणि आमची जीभ गायनाने भरली.
नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले;
परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.
परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत;
आम्ही किती हर्षित झालो आहोत!
परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे
आम्हास बंदिवासातून परत आण.
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो,
तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.