इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 124
शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र
आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर
आमच्या बाजूला नसता,
जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले,
तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला,
त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते;
प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
परमेश्वराचा धन्यवाद होवो,
त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे;
पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर
त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.