इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 123
दयेची याचना
स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या,
तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात,
जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात,
तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर
आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर,
कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा,
आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी
आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.