Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 122

यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना

दाविदाचे स्तोत्र

आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते1 मला म्हणाले,

तेव्हा मला आनंद झाला.

हे यरूशलेमे,

तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.

हे यरूशलेमे,

एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.

इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे,

तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,

परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.

कारण तेथे न्यायासने,

दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.

यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा!

तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.

तुझ्या कोटात शांती असो,

आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.

माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता,

मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.

परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता,

मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.

Source notes (1)
  1. Footnote माझे मित्र

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.