गण
Numbers
Introduction from this edition
गणना
लेखक
सार्वभौम यहूदी आणि ख्रिस्ती परंपरेनुसार मोशेला गणना या पुस्तकाचे लेखकत्व प्राप्त होते. पुस्तकात अनेक आकडेवारी, लोकसंख्येची मोजणी, वंश आणि याजाकांची आकडेवारी आणि इतर संख्यात्मक माहिती समाविष्ट आहे. निर्गमच्या दुसऱ्या वर्षापासून 38 वर्षांपर्यंतचा काळाचे वर्णन गणना पुस्तकात केले आहे, जेव्हा नवीन पिढी प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास तयार असेल तेव्हा निर्गमनंतर 40 व्या वर्षी सीनाय पर्वतावर राष्ट्र छावणीत असेल. याशिवाय, हे पुस्तक केवळ दुसऱ्या वर्षाच्या इतिहासाचे तपशील देते आणि 40 वर्षांच्या भटकंतीनंतर 38 वर्षे शांत राहते.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1446 - 1405.
सीनाय पर्वतावर छावणीत असताना इस्त्राएली लोक मिसर देशामधून बाहेर पडल्यावर दुसऱ्या वर्षाच्या सुरवातीला पुस्तकाच्या घटनांची सुरुवात झाली (1:1).
प्राप्तकर्ता
प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत आपला प्रवास नोंदवण्यासाठी इस्त्राएल लोकांची ही संख्या लिहिण्यात आली होती; पण पवित्र शास्त्राच्या सर्व भावी वाचकांना याची आठवण करून दिली की आपण स्वर्गाच्या दिशेने प्रवास करताना देव आमच्याबरोबर आहे.
हेतू
मोशेने त्या पिढीला विश्वासाद्वारे देवाने प्रतिज्ञावत दिलेली जमीन घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दुसरी पिढी प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास तयार होती म्हणून गणना हे पुस्तक लिहिले (गणना 33:2). गणना देखील राष्ट्राला परमेश्वराचा निःस्वार्थ विश्वासूपणा दर्शविते. ज्यावेळी पहिली पिढी कराराच्या आशीर्वादांना नाकारते, त्यावेळी देव करार करण्यासाठी विश्वासू आहे. त्यांच्या तक्रारी व बंडखोरपणा असूनही, तो अद्यापही देशाला आशीर्वाद देतो आणि दुसऱ्या पिढीला त्याच्या अभिवचनाची पूर्तता करतो.
विषय
प्रवास
रूपरेषा
1. प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रस्थान करण्याची तयारी — 1:1-10:10
2. सिनाय ते कादेशापासून प्रवास — 10:11-12:16
3. बंडखोरपणामुळे होणाऱ्या विलंबाचा परिणाम — 13:1-20:13
4. कादेश पासून मवाबाच्या खोऱ्यापर्यंत प्रवास — 20:14-22:1
5. प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत जाण्याचा अंदाज घेऊन मवाबामध्ये इस्त्राएल — 22:2-32:42
6. विविध बाबींशी संबंधित परिशिष्ट — 33:1-36:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.