उत्प
Genesis
Introduction from this edition
उत्पत्ति
लेखक
यहूदी परंपरा आणि पवित्र शास्त्रातील इतर पुस्तकांचे लेखक इस्त्राएलाचा संदेष्टा आणि मुक्तिदाता मोशे याला जुन्या करारातील पहिल्या पाच पुस्तकांचा लेखक मानतात. मिसर देशातील न्यायालयात त्याचे शिक्षण झाले असून (प्रेषित. 7:22), देव परमेश्वराशी त्याचा जिव्हाळ्याचा संबंध होता. येशू स्वतःच मोशेच्या लेखकत्वाची पुष्टी करत होता (योहान 5:45-47), जसे की त्याच्या काळातील शास्त्री आणि परुशी देखील करत होते (मत्तय 19:7; 22:24).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1446 - 1405.
मोशेने कदाचित या पुस्तकाचे लिखाण केले तेव्हा इस्त्राएल लोक सीनाय येथील अरण्यात छावणीत असावेत अशी शक्यता आहे.
प्राप्तकर्ता
प्रतिज्ञावत दिलेली जमीन कनानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिसर देशाच्या बंदीवासातून बाहेर आलेले इस्त्राएली लोक या पुस्तकाचे प्राप्तकर्ते होते.
हेतू
आपल्या देशाचा ‘कौटुंबिक इतिहास’ स्पष्ट करण्यासाठी मोशेने हे पुस्तक लिहिले. उत्पत्तीच्या लिखाणानुसार मोशेचा हे पुस्तक लिहिण्या पाठीमागील उद्देश म्हणजे इस्राएल राष्ट्र मिसराच्या गुलामगिरीमध्ये कसे होते हे स्पष्ट करणे (1:8), ज्या प्रदेशात ते प्रवेश करणार होते ती त्यांना “प्रतिज्ञावत दिलेली जमीन” होती हे स्पष्ट करणे (17:8), मिसरामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर देवाचे सार्वभौमत्व दाखविण्यासाठी आणि मिसरामध्ये त्यांची गुलामगिरी हा एक अपघात नव्हता, परंतु देवाच्या महान योजनेचा एक भाग होता (15:13-16, 50:20), आणि अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव हाच एकमेव देव होता ज्याने जगाची निर्मिती केली हे स्पष्ट करणे होते (3:15-16). इस्त्राएलचा देव मात्र पुष्कळ दैवातांपैकी एक नसून तो स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्वोच्च निर्माणकर्ता होता.
विषय
सुरुवात
रूपरेषा
1. निर्मिती — 1:1-2:25
2. मनुष्याचे पाप — 3:1-24
3. आदामाची वंशावळ — 4:1-6:8
4. नोहाची वंशावळ — 6:9-11:32
5. अब्राहामाचा इतिहास — 12:1-25:18
6. इसहाक व त्याचे पुत्र यांचा इतिहास — 25:19-36:43
7. याकोबाची वंशावळ — 37:1-50:26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.