1 राजे
1 Kings
Introduction from this edition
1 राजे
लेखक
कोणीही 1 राजे च्या लेखकांना ओळखत नाही, काही टीका कारांनी संभाव्य लेखक म्हणून एज्रा, यहेज्केल आणि यिर्मया यांना सुचविले आहे. कारण संपूर्ण कार्यामध्ये चारशेपेक्षा अधिक वर्षांमधील कालावधींचा समावेश होतो, कारण अनेक स्त्रोत सामग्रीचा वापर नोंदी तयार करण्यासाठी केला जात असे. साहित्यिक शैली, पुस्तके इत्यादीसारख्या काही सूचना, आणि एकाधिक संकलक किंवा लेखकांऐवजी एकच संकलक किंवा लेखकांकडे सामग्रीचा वापर केलेला भाग.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 590 - 538.
हे पहिले मंदिर उभे असताना लिहिले होते (1 राजे 8:8).
प्राप्तकर्ता
इस्त्राएलाचे लोक तसेच पवित्र शास्त्राचे सर्व वाचक.
हेतू
हे पुस्तक 1 आणि 2 शमुवेल यांच्या मागोमाग येणाऱ्या भागावर आहे आणि दाविदाच्या मृत्यूनंतर शलमोनाची स्थापना झाल्यानंतर त्याचे राज्य सुरू होते. कथेचा आरंभ एका संयुक्त राज्यापासून होते, परंतु एक राज्य दोन राष्ट्रामध्ये विभागलेले असते ज्याला यहूदा आणि इस्राएल म्हणून ओळखले जाते. 1 आणि 2 राजे हिब्रू पवित्र शास्त्रामध्ये एका पुस्तकात एकत्रित केले आहेत.
विषय
फाटाफूट (ऐक्यभंग)
रूपरेषा
1. शलमोनाचे राज्य — 1:1-11:43
2. राज्याचे विभाजन — 12:1-16:34
3. एलीया आणि अहाब — 17:1-22:53
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.