Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 43
परमेश्वर, मला निर्दोष ठरवा
आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध
माझ्या बाजूने निकाल द्या.
या दुष्ट आणि कपटी लोकांपासून
माझा बचाव करा.
कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात;
तुम्ही माझा त्याग का केला?
शत्रूंद्वारे होणार्या छळामुळे
मी का दुःखी व्हावे?
तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत;
तीच मला मार्ग दाखवोत;
तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात,
तीच मला घेऊन जावोत.
तेव्हा मी परमेश्वराच्या वेदीजवळ जाईन,
तेच परमेश्वर जे माझे परमानंद आहेत;
आणि तिथे हे परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा,
वीणेवर मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास?
आतल्याआत का तळमळत आहेस?
परमेश्वरावर आपली आशा ठेव,
मी पुनः माझा तारणारा आणि
माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.