इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 133
बंधूंच्या ऐक्याची धन्यता
दाविदाचे स्तोत्र
पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे
किती चांगले आणि आनंददायक आहे.
ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे,
त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या
बहुमूल्य तेलासारखे आहे.
सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या
हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे;
कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे
अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.