इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 12
दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना
मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.
हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे.
विश्वासू गायब झाला आहे.
प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो,
प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.
परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ,
जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”
परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो;
ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत,
पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
हे परमेश्वरा, तुच त्यांना 1सांभाळशील,
या पिढीपासून तू त्यांना 2सर्वकाळ राखशील.
मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.
Source notes (2)
- Footnote आम्हास
- Footnote आम्हास
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.