इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 11
सरळतेने चालणाऱ्याचा आधार
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.
परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो;
पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा,
असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?
कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून,
दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.
कारण जर पायेच नष्ट केले,
तर न्यायी काय करणार?
परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे;
त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.
परमेश्वर नितीमानाची पारख करतो.
परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.
तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील,
दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे.
सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.