Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 99

याहवेह राज्य करतात,

राष्ट्रे थरथर कापोत;

ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत;

सर्व पृथ्वी कंपित होवो.

अतिमहान होत सीयोनातील याहवेह;

ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत.

राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत—

याहवेह पवित्र आहेत.

राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे—

तुम्ही याकोबात

निष्पक्षपात प्रस्थापित केला;

जो न्यायसंगत व रास्त आहे.

आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा,

व त्यांच्या चरणी आराधना करा;

याहवेह पवित्र आहेत.

मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते,

व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते;

यांनी याहवेहचा धावा केला,

आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.

ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले;

त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.

याहवेह, आमच्या परमेश्वरा,

तुम्ही त्यांना उत्तर दिले;

त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली,

तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.

आपल्या परमेश्वराची थोरवी गा,

आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा,

कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.