Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 100
एक स्तोत्र. उपकारस्तुतीचे गीत
हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
आनंदाने याहवेहची आराधना करा;
हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.
याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या.
ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत;1
आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.
उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा;
स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा;
त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे;
त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.
Source notes (1)
- Footnote किंवा आम्ही त्यांच्या मालकीचे आहोत
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.