Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 61
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र.
हे परमेश्वरा, माझा धावा ऐका,
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.
दिगंतापासून मी तुमचा धावा करतो
माझे हृदय व्याकूळ झाले असताना;
तुम्हीच मला उंच खडकावर न्या.
कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान,
शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात.
तुमच्या मंडपात सदासर्वकाळ राहण्यास
आणि तुमच्या पंखांच्या सावलीखाली आश्रय घेण्यास मी उत्कंठित आहे. सेला
कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे
आणि तुमच्या नावाचे भय धरणार्यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत.
तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा;
ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.
तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो.
तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा.
म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन
आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.