Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 62
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र.
परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे;
माझे तारण त्यांच्याकडून येते.
फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण;
तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.
तुम्ही सर्वजण या एका मनुष्याला खाली पाडावयास,
कुठपर्यंत माझ्यावर प्रहार करीत राहणार?
मी तर एका वाकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.
मला उच्च स्थानावरून खाली
पाडण्याचा त्यांचा बेत आहे;
त्यांना खोटे बोलणे आवडते;
ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात,
परंतु मनातून शाप देतात. सेला
तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल;
माझी आशा त्यांच्यापासून आहे.
खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण,
तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.
माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून1 आहे;
तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.
माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा;
आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा,
कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला
साधारण मानव श्वासमात्र आहेत;
विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत;
तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील;
ते सर्व श्वासमात्र आहेत.
पिळवणूकीच्या धनावर विश्वास ठेवू नका
किंवा चोरी केलेल्या वस्तूंवर व्यर्थ आशा ठेवू नका;
जरी तुमची संपत्ती वाढत असेल,
तरी तिच्यावर मन लावू नका.
परमेश्वर एकदा बोलले आहेत,
मी दोनदा हे ऐकले आहे:
“सामर्थ्य याहवेहचेच आहे,
आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;”
आणि, “तुम्ही प्रत्येकाला त्याच्या
कृत्यानुसार प्रतिफळ देता.”
Source notes (1)
- Footnote किंवा परमेश्वरच आहे
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.