Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 95

या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या;

आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.

कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ;

आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.

कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत;

समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.

पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत,

आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.

समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले,

आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.

या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या,

आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू;

कारण ते आपले परमेश्वर आहेत.

आपण त्यांच्या कुरणातील प्रजा

आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत.

आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!

“मरीबाह1 येथे असताना केली तशी,

जसे मस्सा2 च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.

माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही,

तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.

चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो;

मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत

आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’

मग मी रागाने शपथ घेतली की,

‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

Source notes (2)
  1. Footnote मरीबाह अर्थात् भांडण
  2. Footnote मस्सा परीक्षा

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.