Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 93
याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत;
याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत;
निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे.
तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे;
तुम्ही अनंतकाळापासून आहात.
याहवेह, महासागर उसळत आहेत;
महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे;
समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे.
सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली,
तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात—
सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.
हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत;
पवित्रता हे तुमच्या भवनाचे
अनंतकाळचे आभूषण आहे.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.