Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 47
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा;
उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.
कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत;
ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.
त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली
आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले.
ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात,
हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला
प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत,
तुतार्यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत.
परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा;
आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा.
कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत;
त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा.
परमेश्वर सर्व राष्ट्रांवर सत्ता गाजवितात;
परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर विराजमान आहेत.
जगातील लोकांचे अधिपती,
अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत;
पृथ्वीवरील राजे1 वास्तविक परमेश्वराचेच आहेत,
ते अत्यंत थोर आहेत.
Source notes (1)
- Footnote किंवा ढाली
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.