Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 16
दावीदाचे मिक्ताम
परमेश्वरा, माझे रक्षण करा,
कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.
मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात;
तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.”
पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत,
“ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.”
जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील.
अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही
किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही.
याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात;
तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता.
माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत;
माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.
मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे;
रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.
मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे;
ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.
यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे;
माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल.
कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही;
किंवा तुमच्या विश्वासणार्याला1 तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.
तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल;
तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल,
तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.
Source notes (1)
- Footnote किंवा पवित्राला
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.