Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 135

याहवेहचे स्तवन करा.

याहवेहच्या नामाचे स्तवन करा;

तुम्ही, जे याहवेहचे सेवक आहात, ते सर्व याहवेहचे स्तवन करोत.

व तुम्हीही, जे याहवेहच्या आवासात,

आमच्या परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात सेवा करतात.

याहवेहचे स्तवन करा, कारण ते चांगले आहेत;

त्यांच्या नावाचा महिमा गा, कारण ते करणे मनोरम आहे.

कारण याकोबाला आपलेसे करावे,

इस्राएलला त्यांची मौल्यवान संपत्ती म्हणून याहवेहने त्यांना निवडले.

मला माहीत आहे की याहवेह महान आहेत,

ते देवाधिदेव आहेत.

याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर,

सागरांमध्ये आणि त्याच्या अत्यंत खोलात देखील,

त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.

पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात;

पर्जन्यवृष्टीसह ते विजा पाठवितात

आणि आपल्या भांडारातून ते वारे प्रवाहित करतात.

त्यांनी प्रत्येक इजिप्ती ज्येष्ठ संतानाचा नाश केला,

मनुष्य तसेच जनावरांच्या कळपातील प्रथम वत्साचा.

हे इजिप्त, त्यांनीच तुझ्यामध्ये महान चमत्कार केले,

जे फारोह आणि त्याच्या सर्व लोकांविरुद्ध होते.

त्यांनीच मोठमोठ्या राष्ट्रांवर प्रहार केले,

आणि बलाढ्य राजांचा वध केला.

अमोरी लोकांचा राजा सीहोन,

बाशानचा राजा ओग

आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.

तत्पश्चात त्यांची भूमी त्यांनी वतन म्हणून,

आपली प्रजा इस्राएली लोकांना देऊ केली.

हे याहवेह, तुमचे नाव चिरकाल टिकते;

तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकणारी आहे.

कारण याहवेह आपल्या लोकांना निर्दोष प्रमाणित करतील,

आणि आपल्या सेवकांवर करुणा करतील.

परंतु राष्ट्रांच्या मूर्ती चांदीच्या आणि सोन्याच्या आहेत,

त्या तर मानवी हातांनी घडविलेल्या आहेत.

त्यांना तोंडे आहेत, परंतु बोलता येत नाही,

त्यांना डोळे आहेत, परंतु ते बघू शकत नाहीत.

त्यांना कान आहेत, परंतु ऐकू येत नाही,

ना त्यांना श्वास घेता येतो.

जे मूर्ती घडवितात ते त्यांच्यासारखेच होतील,

आणि सर्वजण जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात तेही तसेच होतील.

हे संपूर्ण इस्राएला, याहवेहचे स्तवन कर;

अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा.

अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा;

त्यांचे भय धरणार्‍या लोकांनो, याहवेहचे स्तवन करा.

सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो,

अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा.

याहवेहचे स्तवन करा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.