Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 129
प्रवाशांचे आराधना गीत.
“माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,”
इस्राएल म्हणो;
“माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे,
तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.
शेतकर्याने नांगरल्याप्रमाणे
त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.
परंतु याहवेह न्यायी आहेत;
त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”
सीयोनाचा द्वेष करणारे सर्व
लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.
घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत,
जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;
कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही,
की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.
येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत,
“याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत;
आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.