इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 96
उपकारस्तुतीचे गीत
1 इति. 16:23-33
अहो, परमेश्वरास नवीन गीत गा;
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या;
दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
राष्ट्रात त्याचे गौरव,
त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे.
सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत.
सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा;
परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा.
अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा.
हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो.
जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे.
तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो;
समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत.
मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे;
पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे;
तो न्यायीपणाने जगाचा
व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.