Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 93

परमेश्वराचे माहत्म्य

परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे;

परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे.

जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.

तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे;

तू सर्वकाळापासून आहेस.

हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे;

आपला आवाज उंचावला आहे,

महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.

खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड

लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला

परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.

तुझे नियम अतिसत्य आहेत;

हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता

सदासर्वकाळ शोभते.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.