इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 87
सीयोनेत राहण्याचा मान
परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास
सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
राहाब 1आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन.
पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता;
आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
लोकांची नोंदणी करताना,
ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की,
माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”
Source notes (1)
- Footnote मिसर देश
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.