Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 84

देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ

कोरहाच्या मुलांची स्तोत्रे

हे सेनाधीश परमेश्वरा,

तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे.

माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे;

माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे.

हे सेनाधीश परमेश्वरा,

माझ्या राजा, माझ्या देवा,

तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर

आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे.

जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत;

ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील.

ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे,

ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे.

शोकाच्या 1खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात.

आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो.

ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात;

त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते.

हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक;

याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक.

हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर,

तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.

तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे;

दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.

कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे;

परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो;

जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.

हे सेनाधीश परमेश्वरा,

जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.

Source notes (1)
  1. Footnote बाका

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.