इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 82
विपरीत न्यायाला दूषण देणे
आसाफाचे स्तोत्र
देव दैवी मंडळीत उभा आहे,
तो देवांच्यामध्ये 1न्याय देतो.
कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल?
आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे;
त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत;
ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात;
पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
मी म्हणालो, “तुम्ही देव आहात,
आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल,
आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर,
कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.
Source notes (1)
- Footnote स्वर्गीय जनांमध्ये
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.