Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 61

देवाच्या संरक्षणावर भरवसा

दाविदाचे स्तोत्र

हे देवा, माझी आरोळी ऐक;

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.

जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन;

माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.

कारण तू माझ्यासाठी आश्रय,

माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.

मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन;

मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.

कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस;

जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.

तू राजाचे आयुष्य वाढव;

त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.

मी देवासमोर सर्वकाळ राहो;

तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.

मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन,

म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.