Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 54

शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना

दाविदाचे स्तोत्र

हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव,

आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.

हे देवा, माझी प्रार्थना ऐक;

माझ्या शब्दाकडे कान दे.

कारण माझ्याविरूद्ध परके 1उठले आहेत,

आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत;

त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.

पाहा, देव माझा मदतनीस आहे;

प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.

तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील;

तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.

मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण;

हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.

कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे;

माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.

Source notes (1)
  1. Footnote गर्विष्ठ

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.