इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 24
गौरवाचा राजा
दाविदाचे स्तोत्र.
भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे.
जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.
कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला,
आणि जलांवर त्याने ती स्थापली.
परमेश्वराच्या 1डोंगरावर कोण चढेल?
परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू2 शकतो?
ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे,
ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही,
आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल,
आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.
हिच पिढी त्यास शोधणारी आहे,
जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.
अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा.
पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा,
म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
गौरवशाली राजा कोण आहे?
तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.
वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.
सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा,
म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
तो गौरवशाली राजा कोण आहे?
सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे,
तोच तो गौरवशाली राजा आहे.
Source notes (2)
- Footnote सियोन पर्वत
- Footnote आराधना करू
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.