इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 129
सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना
इस्राएलाने आता म्हणावे की,
माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला,
तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले;
त्यांनी आपली तासे लांब केली.
परमेश्वर न्यायी आहे;
त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
जे सियोनेचा तिरस्कार करतात,
ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच
सुकून जाते त्यासारखे होवोत.
त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही,
किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की,
“परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो;
परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.