Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 114

आश्चर्यकारक निर्गमन

निर्ग. 14:1-31

जेव्हा इस्राएल मिसरातून,

याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,

तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला,

इस्राएल त्याचे राज्य झाले.

समुद्राने पाहिले आणि पळाला;

यार्देन मागे हटली.

पर्वतांनी मेंढ्यांसारख्या,

टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.

हे समुद्रा, तू का पळून गेलास?

यार्देने तू का मागे हटलीस?

पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता?

लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?

हे पृथ्वी, तू प्रभूसमोर,

याकोबाच्या देवासमोर थरथर काप.

तो खडक पाण्याच्या तळ्यात,

कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.