Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 111

परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो

परमेश्वराची स्तुती करा.

सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.

परमेश्वराचे कार्य महान आहेत,

जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.

त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे,

आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.

त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले;

परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.

तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो.

तो आपला करार नेहमी आठवतो.

त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन,

आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.

त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे;

त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.

ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत,

ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.

त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे;

त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे,

देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे.

परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे;

जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते.

त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.