Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 112

परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट

परमेश्वराची स्तुती करा.

जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो,

जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.

त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील;

धार्मिक आशीर्वादित होतील.

धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत;

त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते.

धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो;

तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.

जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो,

जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.

कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही;

नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.

तो वाईट बातमीला भिणार नाही;

त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.

त्याचे हृदय निश्चल आहे,

आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.

तो गरीबांना उदारपणे देतो;

त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील;

तो सन्मानाने उंचविला जाईल.

दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील;

तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल;

दुष्टाची इच्छा नाश होईल.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.