Skip to content
BibleKenya

फिले

Philemon

Introduction from this edition

फिलेमोनाला पत्र

लेखक

फिलेमोनाच्या पुस्तकाचे लेखक प्रेषित पौल होता (1:1). फिलेमोनाला लिहिलेल्या पत्रात पौल सांगतो की तो अनेसिमला फिलेमोनकडे परत पाठवत आहे आणि कलस्सै 4:9 मध्ये अनेसिमची ओळख पटली आहे ज्याने तुखिकस (कलस्सैकरांना पत्र पाठविणारा) असलेली कलस्सैमध्ये येत आहे. हे मनोरंजक आहे की पौलाने हे पत्र देखील आपल्या हातांनी लिहिले आहे, हे दाखविण्यासाठी की ते त्याच्यासाठी किती महत्त्वपूर्ण होते.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ.स. 60.

पौलाने रोममध्ये फिलेमोन यास पत्र लिहिले, पौल फिलेमोनाला पत्र लिहिण्याच्या वेळी कैदी होता.

प्राप्तकर्ता

पौलाने फिलेमोन, अफ्फिया, आणि अर्खिप्पच्या घरी भेटणाऱ्या मंडळीला पत्र लिहिले. पत्र सामग्री पासून, हे प्राथमिक हेतू वाचक फिलेमोन होता स्पष्ट आहे.

हेतू

पौलाने फिलेमोनला अनेसिमला (दास अनेसिम याने आपला मालक फिलिमोन याला लुटले आणि पळून गेला) दंडाशिवाय परत घेण्यास सांगितले (10-12, 17). याशिवाय फिलेमोनने अनेसिमला केवळ दास म्हणून नव्हे तर “प्रिय बंधू” म्हणून वागण्याची इच्छा आहे (15-16). अनेसिम अजूनही फिलेमोनाची संपत्ती होता आणि पौलाने आपल्या स्वामीला परत येण्याची वाट मोकळी करण्यासाठी लिहिले. पौलाच्या त्याच्याविषयीच्या साक्षीद्वारे, अनेसिम ख्रिस्ती झाला होता (1:10).

विषय

क्षमाशीलता

रूपरेषा

1. नमस्कार — 1:1-3

2. धन्यवाद देणे — 1:4-7

3. अनेसिमसाठी मध्यस्थी — 1:8-22

4. अंतिम शब्द — 1:23-25

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.