Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

यहे 23

दोन बहिणी

परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला, दोन स्त्रिया एकाच आईच्या मुली होत्या. त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिसरात वेश्या कर्म केले. त्यांची स्तने चुरली व कुमारी असतांना त्यांच्या छातीला गोंजारण्यात आले. त्यांची नावे अहला थोरली व अहलीबा धाकटीचे नाव आहे, ते माझे झाले आहेत आणि त्यांनी पुत्राला व कन्येला जन्म दिला. त्यांच्या नावाचा अर्थ येणे प्रमाणे आहे. अहला म्हणजे, शोमरोन आणि ओहलीबा म्हणजे यरूशलेम.

परंतू अहला जेव्हा ती माझी होती तेव्हापासून तिने वेश्या कर्म केले; तिच्या प्रियकरांशी ती वासनेने कामसक्त झाली होती, अश्शूरांच्या हाती ते सत्ता असलेले होते. राजधिकाऱ्याने जांभळी वस्त्रे परिधान केली होती. जे सर्व पुरुषात बलवान व देखणे होते, त्यातील सगळे घोड्यावर स्वार होऊन आले आहेत. तिने स्वत:ला वेश्याकामासाठी त्यांना सर्वात उत्तम अश्शूरी देऊन टाकले, तिने स्वत:ला काम संतप्तेने प्रत्येकासोबत स्वत:ला अशुद्ध केले, तिने मुर्तीसोबत तिने कामसंतप्त पणा केला.

तिने मिसरात कुठलाही वेश्याकर्म मागे ठेवला नाही, जेव्हा ती कुमारी होती तेव्हा ते तिच्या सोबत झोपले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिच्या कुमारीपणात स्तनांना दाबले त्यांनी पहिल्यांना तिच्या सोबत संभोग केला. यास्तव मी तिला तिच्या प्रियकरांच्या हाती दिले अश्शूर ज्यांनी तिच्याशी व्यभिचार केला. त्यांनी तिला नग्न केले. त्यांनी तिच्या मुला मुलींना नेऊन तलवारीने मारुन टाकले, ती स्त्रियांमध्ये निंदेचा विषय झाली, यामुळे तिचा न्याय निवाडा करण्यात आला.

तिची बहिण अहलीबा हिने हे पाहिले, पण तिने आपल्या बहिणीहून अधिक व्यभिचार केला आणि वेश्याकर्म केले. अश्शूरांशी तिने व्यभिचार केला, अधिपती, नायब अधिपती, भरदार पोषाख घातलेले, घोड्यावर बसणारे सरदार व सर्व देखण्या तरुणांशी तिने व्यभिचार केला. मी पाहिले तिने स्वत:ला अपवित्र केले. त्या दोघी बहिणींनी एकसमान कार्य केले.

मग तिने आपल्या व्यभिचाराच्या कारवाया अजून वाढवल्या. तिने भिंतीवर रेखाटलेले चित्र काढले, तिने खास्द्यांची लाल रंगाने आकृती रेखाटली. आपल्या कमेरेस बंद घालून रंगीबेरंगी फेटे घालून ते सर्व रथात खास्दी देशातील बाबेलाच्या अधिकाऱ्यासारखी दिसत असून आपल्या जन्मभूमित होती.

जशी तिची नजर जाच्यावर गेली त्याच्याशी तिने व्यभिचार केला म्हणून तिने खास्द्यांच्या देशात निरोप्या पाठवला. मग बाबेल तिच्या पलंगावर जाऊन तिच्याशी व्यभिचार केला आणि त्याने तिच्याशी वेश्याकर्म केले व स्वत:ला अशुद्ध केले, तिने आपले मन त्याजवरुन दूर केले. तिने आपल्या व्यभिचाराचा खेळ मांडला व आपली लाज उघडी केली, जसे माझे मन तिच्या बहिणीहून मन दूर झाले तसे तिच्या वरुन मन दूर झाले.

मग तिने आपल्या व्यभिचाऱ्याच्या कारवाया अधिक वाढवल्या आहेत, तिला तिचे स्मरण होऊन तिने व्यभिचार अधिक वाढवला, जेव्हा तिने मिसरात आपला व्यभिचाराचा स्वभाव ठेवला. तेव्हा तिने आपल्या प्रियकरांशी व्यभिचार केला, ज्यांचे अवयव गाढवाच्या अवयवासारखे होते, व माज घोड्या सारखे होते. पुन्हा त्यांनी लज्जास्पद आपल्या तारुण्यात गैरवर्तन केले जेव्हा मिसऱ्यांनी तिचे स्तन गोंजारले. यास्तव अहलीबे परमेश्वर देव म्हणतो, “पहा, मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरूद्ध करीन; ज्यांच्या हून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरूद्ध सभोवतालच्या लोकांस करीन. बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, व कोआ येथील लोक व अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करीन.

ते तुझ्या विरुध्द शस्त्रे, रथ, वाहने, घेऊन येतील. ते मोठे कवच, ढाली, शिरस्त्राण सभोवताली घेऊन येतील तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील. मी माझा राग त्यांच्यावर रोखीन मी त्वेषाने त्यांचा समाचार घेईन ते तुझे कान नाक कापून टाकतील, उरलेले तलवारीने पडतील, तुझ्या पुत्र कन्येला ते घेऊन जातील, व तुझ्या संतानाला अग्नी खाऊन टाकील.

ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिनेही घेऊन जातील. मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही.

यास्तव परमेश्वर देव असे म्हणतो, पाहा! ज्यांचा तू द्वेष करतेस मी तुला त्यांच्या हाती देईन, ज्यांच्यावरुन तुझे मन दूर झाले त्यांच्या हाती मी तुला देईन. क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील; ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही, वेश्याकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव, रसमिसळ भाव जाहीर केला जाईल. या सर्वकाही बाबी तुझ्या वेश्या कामासाठी केले जाईल तू मुर्तीसोबत राष्ट्रांना अशुद्ध केलेस. तू तुझ्या बहिणीच्या मार्गाने चाललीस, म्हणून मी शिक्षेचा प्याला तिच्या हाती सोपवून देईन.

प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस, जो खोल व मोठा आहे, तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील या प्याल्यात मोठा भरणा असेल.

तू मद्यपानाने व दुःखाने भरली जाशील व भिती, धुळधाण हा प्याल्या शोमरोन तुझ्या बहिणीचा आहे.

तू पिणार व नाल्यात रिकामे सोडशील, तुझे अनेक तुकडे केले जातील आणि तुझ्या स्तनांचे अनेक तुकडे केले जातील. असे मी जाहीर करतो, मी परमेश्वर देव जाहीर करत आहे.

यास्तव प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, कारण तू मला विसरलास व मला मागे फेकून दिलेस तसेच स्वत:ला उंच करून आपला लाजीरवाणा जारकर्मी स्वभाव प्रकट केला.”

परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू अहला आणि अहलीबा यांचा न्याय करशील काय? म्हणून त्यांना त्यांचे किळसवाणे मार्ग सादर कर, जेव्हापासून त्यांनी व्यभिचार मुर्तीसोबत केला व त्यांच्या संतानांना पुढे वारशाने दिला व पिऊन टाकणाऱ्या अग्नीसाठी भगदड पाडले.

आणि त्यांनी सतत माझ्याशी असेच वर्तन ठेवले, त्यांनी माझे स्थान अपवित्र केले आणि त्याच दिवशी त्यांनी माझा शब्बाथात भेसळ केली. जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळांचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या स्थानी येऊन माझा शब्बाथ भेसळ केला मग पाहा! त्यांनी माझ्या घरात हेच केले.

लांबून आलेल्या लोकांस तू बाहेर पाठवून दिले तू निरोप्याला पाठवलेस आता पाहा ते खरोखर येतील ज्यांची तू आंघोळ घालशील डोळ्यात अंजन घातलेस व दागीन्यांनी आपणास नटवीले. वेल बुट्टीदार पलंगावर आणि त्याज पुढे मेज मांडला व त्यावर सुगंधी द्रव्य व तेल मांडले.

मग लोकांच्या गर्दीच्या आवाजात काळजी करणारे होते आणि रानातून मद्यपी, नालायक लोकांस जंगलातून आणण्यात आले. त्यांनी आपल्या हातात कडे घातले होते व मस्तकावर मुकुट घातला होता. मग मी त्यांना एक झिजून गेलेली व्यभिचाराच्या कृत्यांबद्दल सांगितले, ‘आता ते तिच्याशी व ती त्यांच्याशी जारकर्म करील.’ ते जसे वेश्येकडे जातात तसे ते अहला व अहलीबा या दोषी वेश्येकडे गेले.

पण धार्मिक लोक तिच्या व्यभिचारासाठी व रक्तपातासाठी तिच्या हातून घडलेल्या पातकांचा न्याय निवाडा करतील.

प्रभू परमेश्वर म्हणतो, मी त्याजवर लोकसमुदाय आणून दहशत घालीन व ते आतंक, लुटमार करतील. मग लोकसमुदाय त्यांना धोंडमार करतील व तलवारीने त्यांचे तुकडे करतील, त्यांच्या मुलाबाळांना मारुन टाकतील व त्यांच्या घरांना जाळून टाकतील.

मी भूमीतील लज्जास्पद स्वभाव काढून टाकीन व सर्व स्त्रियांना शिस्त लावीन यापुढे ते वेश्याकर्म करणार नाहीत. मग त्यांचे लज्जास्पद वर्तन तुझ्याविरुध्द करीन तू मुर्तीसोबत केलेल्या पापाचे फळ भोगशील मग यामार्गाने तुला कळेल मी परमेश्वर देव आहे.”

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.