Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

यहे 17

गरुडांचा ल द्राक्षवेलीचा दुष्टान्त

परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग. सांग की परमेश्वर देव तुम्हास सांगत आहे, एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत ते लबानोन पर्वतावर गेला व त्यांने गंधसरुची फांदी मोडून टाकली. त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्यास कनानात घेऊन गेला, त्यास व्यापाऱ्यांच्या शहरात लावले. त्याने त्यातले काही बीज घेतले आणि पेरणी करण्यासाठी तयार भूमीत जेथे विपुल पाणी होते तेथे वाळुंजासारखे लावले. मग त्याची वाढ होऊन द्राक्षाच्या झाडाच्या फांद्या पसरल्या व गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मुळ त्याकडे वाढ झालेले होते. पण तेथे अजून एक मोठा गरुड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता आणि पाहा! या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्यांच्या फांद्याही गरुडाकडे पसरलेल्या होत्या, त्यास रोपन केल्या पासून त्यास विपुल पाणी घातले होते. त्यास सुपीक जमीनीत विपुल पाण्याजवळ रोपण केलेले होते त्यामुळे त्यांच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले, त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली. हे घडेल का? लोकांस असे सांगा परमेश्वर देव हे म्हणतो; त्याचे मुळ उपटून टाकू नका; आणि त्याची फळे तोडू नका, त्यांची वाढ सुकून जाईल; कोणतेही बाहूबल कोणताही जनसमुदाय त्यास उपटून टाकणार नाही. मग पाहा! त्यास रोपन केल्यावर त्याची वाढ होईल, ते सुकून जाणार नाही? जेव्हा पूर्वेकडील वारा त्यास स्पर्श करेल? ते आपल्या जागेत पूर्ण वाळून जाईल. मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला बंडखोर घराण्याशी बोल या गोष्टी काय आहे ते तुला माहित नाही का? पाहा! बाबेलचा राजा यरूशलेमकडे येईल त्यांचा राजा आणि राज पुत्राला घेऊन, बाबेलात जाईल. मग राजवंशाला घेऊन जाईल, त्याच्याशी करार करेल आणि त्यांना शपथेखाली घेऊन येईल. आणि भूमीतील बलवानांना सोबत घेऊन जाईल. मग राज्य रसातळाला जाईल मग उच्च पातळी गाठणार नाही, त्याचा करार मान्य करुनच भूमीवर वावरता येईल. पण मिसऱ्यांनी त्यास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून तो आपला राजदुत पाठवून त्याजविरूद्ध बंड करेल तो यशस्वी होईल का? या गोष्टी करणाऱ्याची सुटका होईल का? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याची सुटका होईल का? माझ्या जीवताची शपथ असे परमेश्वर देव जाहीर करतो तो निश्चित राज्याच्या भूमीत मरेल ज्याने त्यास राजा केले, ज्या राजाने करार केला ज्याने त्यास तुच्छ लेखून करार मोडला. तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल. फारो आपल्या पराक्रमी बाहूबलाने अनेक लोकांस जमवेल युध्दाने त्याचा बचाव होणार नाही, जेव्हा बाबेलाच्या पर्वतावर वेढा बुरुज बांधतील आणि अनेकांचा धुव्वा उडवण्यासाठी ते बुरुज पाडून टाकतील. करार मोडून राजाने शपथेला तुच्छ लेखले, पाहा! तो आपल्या हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही. यास्तव परमेश्वर देव असे सांगतो जसे मी शपथेने म्हणतो, त्याने करार मोडला आणि तुच्छ लेखले? म्हणून मी त्याच्या माथी शासन आणिन; मी आपले पाश त्याच्यावर टाकीन, त्यास पारध म्हणून पकडेन, मग त्यास बाबेलात नेईन आणि शासन अमलात आणिन जेव्हा त्यांनी देशद्रोह केला व माझ्याशी विश्वासघात केला. आणि त्याच्या बाहूबलाचे सर्व शरणस्थान तलवारीने मोडले गेले, आणि जे उरलेले सर्व दिशेने विखुरले गेले आहे, मग तुला कळेल मी परमेश्वर देव आहे, मी जे बोलले ते घडेल. परमेश्वर देव हे म्हणतो, मग मी स्वतःला देवदार झाडाच्या उच्च ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्यांचे रोपन करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वतःला उच्चस्थानी स्थापील. मी त्यांना इस्राएलाच्या पर्वतावर रोपन करेल व त्यांना फांद्या, फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात्त होतील म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली राहतील, ते त्यांच्या फांद्यांमध्ये घरटे करतील. मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेन; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहीर केले आहे ते घडेल.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.