Indian Revised Version(IRV) Marathi - 2019
स्तोत्र 149
इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश
परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वरास नवे गीत गा;
विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो.
सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत;
ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे;
तो दीनांना तारणाने गौरवितो.
भक्त विजयाने हर्षभरित होवोत;
ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो,
आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा
आणि लोकांस शिक्षा करावी.
ते त्यांच्या राजांना साखळंदडाने
आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील.
हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे.
परमेश्वराची स्तुती करा.
Indian Revised Version(IRV) Marathi - 2019. Copyright © Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.