Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

स्तोत्रसंहिता 52

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे.

हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस,

तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस,

तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?

तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे,

दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी

विनाशाची योजना करीत असते.

तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा,

सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. सेला

अगे कपटी जिभे,

अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!

परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील;

तुझ्या डेर्‍यातून तुला ओढून बाहेर काढतील

आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. सेला

नीतिमान लोक भयचकित होऊन पाहतील;

ते त्याला हसतील व म्हणतील:

“पाहा, हा असा मनुष्य आहे

ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही

तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला

आणि दुसर्‍यांचा नाश करून तो बलवान झाला!”

परंतु मी तर परमेश्वराच्या आश्रयाखालील

जैतून वृक्षाप्रमाणे सुरक्षित आहे;

परमेश्वराच्या अक्षय प्रीतिवर मी

सदासर्वकाळ विसंबून आहे.

कारण तुम्ही जे काही केले

त्याबद्दल तुमच्या विश्वासू लोकांसमक्ष मी सदासर्वकाळ तुमची स्तुती करेन.

आणि मी तुमच्या नावाची आशा करेन,

कारण तुमचे नाव चांगले आहे.

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.