Biblica® Open Marathi Contemporary Version
स्तोत्रसंहिता 23
दावीदाचे स्तोत्र.
याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात,
ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात.
ते माझा जीव ताजातवाना करतात.
ते आपल्या नावासाठी
मला नीतिमार्गाने चालवितात.
मृत्युछायेच्या दरीतूनही1
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत
माझ्यापुढे ताट वाढता;
तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता;
माझा प्याला भरभरून वाहत आहे.
खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती
मजबरोबर आयुष्यभर असतील,
आणि मी याहवेहच्या,
घरात सदासर्वदा राहीन.
Source notes (1)
- Footnote किंवा अंधार्या दरीतून
Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.