Biblica® Open Marathi Contemporary Version
स्तोत्रसंहिता 15
दावीदाचे स्तोत्र.
याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल?
तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?
ज्याचे चालणे निर्दोष आहे,
जो धार्मिकतेचे आचरण करतो,
जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;
जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही,
जो आपल्या शेजार्यांचे वाईट करीत नाही,
आणि इतरांना काळिमा लावत नाही;
जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो,
याहवेहचे भय धरणार्यांचा सन्मान करतो,
आणि जो स्वतःचे नुकसान होत असले
तरी दिलेले वचन पाळतो;
जो व्याज न आकारता पैसे उसने देतो;
जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही,
जो कोणी या गोष्टी करतो
तो कधीही ढळणार नाही.
Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.