Biblica® Open Marathi Contemporary Version
स्तोत्रसंहिता 126:5
Verse 5 is marked below, with the whole chapter around it. Read from the start
प्रवाशांचे आराधना गीत.
जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले1,
तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
आमचे मुख हास्याने भरले होते
आणि किती हर्षगीते आम्ही गाईली!
तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली:
“पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत,
आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
हे याहवेह, नेगेव नदीसारखी,
आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या2.
जे अश्रूंनी पेरणी करतात,
ते आनंदाने कापणी करतील.
जे रडत पेरणीसाठी
बी घेऊन जातात,
ते आपल्या पेंढ्या घेऊन,
आनंदाने हर्षगीते गात परत येतील.
Source notes (2)
- Footnote किंवा जेव्हा इस्राएलला बंदिवासातून परत आणले
- Footnote म्हणजे आमच्या बंदिवासांना परत आणा.
Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.