Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 70
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका.
हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा;
याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.
माझा जीव घेऊ पाहणार्यांना
लज्जित करा व गोंधळात पाडा;
जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत
ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.
जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात,
ते लज्जित होऊन माघारी फिरोत.
परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात
ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत;
जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात
ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”
परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे;
हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या.
तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात;
याहवेह, विलंब करू नका.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.