Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 53
संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील.
मूर्ख आपल्या मनात म्हणतो,
“परमेश्वर अस्तित्वात नाही.”
ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी,
कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.
मानवांमध्ये कोणी समंजस आहे का
परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का
हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून
खाली पाहतात.
प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत;
प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे;
सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय?
भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील.
ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत.
पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले.
परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली,
ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता;
तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत.
अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल!
जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील,
तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.