Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 29

दावीदाचे स्तोत्र.

अहो दिव्यदूतांनो,

याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.

याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या;

पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.

याहवेहची वाणी जलांवर आहे;

गौरवशाली याहवेहची वाणी

महा जलाशयांवर गर्जत आहे.

याहवेहची वाणी प्रतापशाली आहे;

प्रभावी आहे याहवेहचा स्वर.

याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात;

लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.

लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे

आणि सिर्योन1 तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;

याहवेहचा आवाज कडाडतो,

विजा चमकल्यासारखा.

याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात;

कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.

याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात2

आणि वने पर्णहीन होतात.

आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”

याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत;

याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.

याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात;

याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.

Source notes (2)
  1. Footnote अर्थात् हर्मोन पर्वत
  2. Footnote किंवा एला वृक्ष वाकवितात

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.