Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 1
पुस्तक 1
स्तोत्रसंहिता 1–41
धन्य ते लोक,
जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत,
किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत,
आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे,
आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते,
जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते
आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत.
त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
परंतु दुष्ट तसे नाहीत.
ते वार्याने उडून जाणार्या
भुश्यासारखे आहेत.
म्हणून दुष्ट न्यायसभेत,
किंवा पापी लोक नीतिमानांच्या सभेमध्ये उभे राहणार नाहीत.
कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात,
परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.