Skip to content
BibleKenya

रूथ

Ruth

Introduction from this edition

रूथ

लेखक

रूथचे पुस्तक लेखकाचे विशेष नाव देत नाही. परंपरा ही आहे कि रूथ पुस्तक भविष्यवक्ता शमुवेल यांच्याकडून लिहिण्यात आले. याला सर्वात सुंदर लघु कथा असे म्हणण्यात आलेले आहे. पुस्तकाचा शेवटचा शब्द रूथचा आपला नातू, दावीद (रूथ 4:17-22) याच्याशी जोडतो, म्हणून आम्ही हे जाणतो की त्याच्या अभिषेकानंतर हे लिहिण्यात आलेले आहे.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ. पू. 1030 - 1010.

रुथच्या पुस्तकातील घटनांची तारीख मिसरच्या निर्गम काळाशी जोडलेली आहे कारण रूथच्या घटना शास्त्यांच्या काळात जोडल्या जातात आणि शास्त्यांचा काळ हा विजयाशी जोडलेला आहे.

प्राप्तकर्ता

मूळ प्राप्तकर्त्यांना स्पष्टपणे ओळखले जात नाही. असे गृहीत धरले जाते, दाविदाचा 4:22 मध्ये उल्लेख केल्यापासून मूळ लिखाण संयुक्त राजेशाहीच्या काळात लिहिले होते.

हेतू

रूथचे पुस्तक इस्राएली लोकांना आज्ञाधारक राहिल्यास मिळणारे आशीर्वाद प्रदर्शित करते. त्याने त्यांना देवाचे प्रेमळ व निष्ठावान स्वरूप दाखवले. हे पुस्तक असे दर्शविते की देव त्याच्या लोकांच्या दुःखास प्रतिसाद देतो. तो जे उपदेश करतो त्याचाच सराव करतो. नामी व रूथ या दोन विधवा ज्या भविष्याबद्दल थोडीशी आशा बाळगतात, त्यांना असे वाटते की त्यांनी समाजातल्या बहिष्कृत गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. (यिर्मया 22:16; याकोब 1:27).

विषय

पापमुक्त करणे

रूपरेषा

1. नामी आणि तिचे कुटुंब दुःखद घटना अनुभवतात — 1:1-22

2. बवाजाच्या शेतात रूथ सरवा वेचते — 2:1-23

3. नामी रूथला बवाजाकडे जायला सांगते — 3:1-18

4. रूथची पूर्तता केली जाणे आणि नामी पुनर्संचयित होणे — 4:1-22

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.