Skip to content
BibleKenya

लूक

Luke

Introduction from this edition

लूककृत शुभवर्तमान

लेखक

प्राचीन लेखकांचा एकसमान विश्वास असा आहे की लेखक वैद्य लूक आणि त्याच्या लिखाणांमधून तो दुसऱ्या पिढीतील ख्रिस्ती असल्याचे दिसते. परंपरेने, त्याला अन्य जातीय म्हणून पाहिले गेले आहे, तो प्रामुख्याने एक सुवार्तिक होता, ज्याने शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये ही पुस्तके लिहिली, तसेच तो पौलासोबत सेवा कार्यामध्ये होता (कलस्सै. 4:14; 2 तीमथ्य 4:11; फिल. 24).

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ.स. 60 - 80.

लूकने त्याच्या लिखाणाची सुरवात कैसरियामध्ये केली आणि रोममध्ये ते पूर्ण केले. लेखनची महत्वाची जागा बेथलहेम, गालील, यहूदीया आणि यरूशलेम असू शकते.

प्राप्तकर्ता

लूकचे पुस्तक थियफील यास समर्पित आहे, ज्याचा अर्थ देवाचा प्रेमी आहे, हे स्पष्ट नाही की तो आधीपासूनच ख्रिस्ती होता, किंवा बनण्याचा विचार करत होता. खरे तर, लूक त्याला सर्वात श्रेष्ठ समजतो (लूक 1:3). तो असे सांगतो की तो एक रोमी अधिकारी होता, अनेक पुराव्यांपैकी कित्येक पुरावे अन्य जातीय लोकांच्या श्रोत्यांना सूचित करतात आणि त्यांचे मुख्य लक्ष्य मनुष्याचे पुत्र आणि देवाचे राज्य या शब्दांवर होते (लूक 5:24, 19:10, 17:20-21, 13:18).

हेतू

येशूच्या जीवनाचे वर्णन, लूक येशूला मनुष्याचा पुत्र म्हणून प्रस्तुत करतो, त्याने थियफील यास हे लिहिले, जेणेकरून त्याला शिकवलेल्या गोष्टी पूर्णपणे समजल्या जातील (लूक 1:4). येशूच्या अनुयायांबद्दल काहीही विचलित करणारे किंवा भयभीत झालेले नव्हते हे दाखविण्यासाठी छळाच्या वेळी लूक ख्रिस्तीत्वाचे रक्षण करण्यासाठी लिहित होता.

विषय

येशू-परिपूर्ण मनुष्य

रूपरेषा

1. येशूचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन — 1:5-2:52

2. येशूच्या कार्याची सुरुवात — 3:1-4:13

3. येशू हाच तारणाचा लेखक — 4:14-9:50

4. वधस्तंभावर येशूची प्रगती — 9:51-19:27

5. यरूशलेमेमध्ये प्रवेश, वधस्तंभावर चढणे आणि पुनरुत्थान यासाठी येशूची विजयोत्सव प्रविष्टी — 19:28-24:53

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.