Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 75
संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत
हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो,
तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे;
लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.
तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो;
मी सर्वांना रास्त न्याय देतो.
पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले,
तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला1
मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’
आणि दुष्टांना म्हणालो, ‘आपले शिंग उंच करू नका.
आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका;
आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ ”
पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून
मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही.
मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत:
ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्यास उंच करतात.
कारण याहवेहच्या हातात
मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे;
तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे;
सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.
मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन;
मी याकोबाच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईन.
ते म्हणतात, “सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन,
परंतु नीतिमान लोकांची शिंगे उंच करेन.”
Source notes (1)
- Footnote सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.