इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 8
देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी
मुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.
हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून,
बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.
तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या
आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.
तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी?
किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?
तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा1 थोडेसेच कमी केले आहेस.
आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.
तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस.
तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.
सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.
आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे
जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.
हे परमेश्वरा, आमच्या देवा,
सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!
Source notes (1)
- Footnote देवदूतांपेक्षा
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.